महिलेला मारहाण करणाऱ्या दोघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:29 IST2018-03-17T06:29:24+5:302018-03-17T06:29:24+5:30
मोलमजुरी करणा-या महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना येथील न्यायालयाच्या न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

महिलेला मारहाण करणाऱ्या दोघांना सश्रम कारावास
अलिबाग : मोलमजुरी करणा-या महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना येथील न्यायालयाच्या न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
साईनाथ बाळू विटकर, प्रवीण श्रीकांत मुनेश्वर अशी आरोपींची नावे आहेत. पनवेलमधील उलवे नोड येथे संतोषी रामप्रसाद यादव राहत होत्या. आरोपींनी संतोषीच्या नवºयाला घराबाहेर नेले. काही वेळाने सर्वजण दारु पिऊन परतले. त्यांनी संतोषीला जेवण कर, असे सांगितले. तिने नकार दिल्यावर प्रवीण, साईनाथने तिच्यावर सुरीने वार केले. याप्रकरणी साईनाथला दोन वर्षे पाच महिने, तर प्रवीणला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.