वायर चोरणाऱ्या दोघांना अटक

By Admin | Updated: April 25, 2016 03:08 IST2016-04-25T03:08:21+5:302016-04-25T03:08:21+5:30

डिकसळ येथील डायमंड रेसिडेन्सी विजय डेव्हलपर्समध्ये दोन व्यक्ती गुरुवारी रात्री २ च्या सुमारास बिल्डिंगच्या आवारात येऊन बिल्डिंगची वायर चोरून नेत होते.

Both wire steals are arrested | वायर चोरणाऱ्या दोघांना अटक

वायर चोरणाऱ्या दोघांना अटक

नेरळ : डिकसळ येथील डायमंड रेसिडेन्सी विजय डेव्हलपर्समध्ये दोन व्यक्ती गुरुवारी रात्री २ च्या सुमारास बिल्डिंगच्या आवारात येऊन बिल्डिंगची वायर चोरून नेत होते. त्यावेळी वॉचमनच्या हे निदर्शनास आल्याने वायर चोरताना दोन व्यक्तींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड रस्त्यावर डिकसळ येथे डायमंड रेसिडेन्सी विजय डेव्हलपर्स कंपनी आहे. येथे दत्ता धाकवल हे वॉचमनचे काम करत असताना रात्री दोन व्यक्ती बिल्डिंगच्या आवारात येवून बिल्डिंगच्या भिंतीस फिटिंग केलेली वायर नेत होते. ती इलेक्ट्रिक वायर स्वत:च्या फायद्यासाठी चोरु न घेऊन जात असताना सापडले आहेत. यात फरीक इकल्लाख खान(२६), महंमद आफरोज खान(१९) दोघेही कुर्ला -मुंबई येथील राहणारे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत वाघ करत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Both wire steals are arrested