शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

बोर्ली पंचतनमध्ये गणेशोत्सवाची लगबग; मूर्तिकारांचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू, बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 04:43 IST

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन ही महत्त्वाची बाजारपेठ असून जवळपास ४० गावांतील नागरिक या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असतात.

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन ही महत्त्वाची बाजारपेठ असून जवळपास ४० गावांतील नागरिक या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव आल्याने बोर्ली पंचतनच्या बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणाºया विविध शोभेच्या वस्तू, थर्माकोल मखरे त्याचप्रमाणे घरसजावटीच्या वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची दुकानांतून गर्दी आहे. जीएसटीमुळे अगरबत्तीपासून मखर, शोभेच्या वस्तू, रंग यांचे दर वाढल्याने याचा फटकाच सर्वसामान्य जनतेला बसत आहे. परंतु चालू वर्षी गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये जीएसटीमुळे कोणती दरवाढ झाली नसल्याचे गणेश मूर्तिकार सांगतात. तसेच चायनामेड वस्तू विकत घेऊ नका, भारतीय बनावटीच्याच वस्तू विकत घ्या, असे आवाहन सर्व करीत असले तरी चायनामेड वस्तूंची किंमत भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा कमी असल्याने चायना वस्तूच जास्त विकल्या जात असल्याचे व्यापारी सांगतात.बोर्ली पंचतन तसेच दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते, वेळास, आदगाव, दिघी, गोंडघर या गावांमध्ये गणेशमूर्ती कारखाने असून यातून सुमारे १२ हजार गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत व सध्या सर्वच मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत. मूर्तिकारांनी रात्रंदिवस जागून आकर्षक मूर्ती साकारल्या जात आहेत. बोर्ली पंचतन येथील काही नवोदित तरुण मूर्तिकार या व्यवसायामध्ये उतरले असून पेण येथून रेडिमेड मूर्ती आणून त्यांना रंग करून मूर्ती विकत आहेत. बोर्ली पंचतन येथील तीन पिढ्यांपासून मूर्ती कला जपणारे गोविलकर बंधू यांनी सध्या जीएसटी लागू झाला असला तरी गतवर्षी जेवढी किंमत मूर्तीची आकारली त्याच दरामध्ये यावर्षी देखील मूर्ती आम्ही देत आहोत यामुळे चालूवर्षी जीएसटीचा फटका नाही. त्याचप्रमाणे बोर्ली पंचतन बाजारपेठेमध्ये गणेश मखर, सजावटीच्या विविध वस्तू, आकर्षक लाइटिंग, अगरबत्ती, भिंतीचे रंग, थर्माकोलची मखरे व इतर शोभेच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून त्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. परंतु जीएसटीमुळे या सर्व वस्तू १० टक्क्यांनी महागल्या असून याचा फटका गणेशभक्तांना बसत आहे.वस्तूंच्या छापील किमती या जीएसटी वगळून असल्याने त्यावर जीएसटी बसवून व्यापारी वस्तू विकत असले तरी पूर्वीपेक्षा यावर्षी नफा कमी मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. त्याचप्रमाणे सध्या चिनी बनावटीच्या वस्तूंनी देखील बाजारपेठा व्यापलेल्या आहेत, आपण सर्वांनी सध्या यासाठी कितीही आवाहन केले की भारतीय बनावटीच्या वस्तूच खरेदी करा तरी देखील बाजारपेठेमध्ये चायनामेड वस्तूंनाच मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. भारतीय बनावटीच्या वस्तू महाग असल्याने ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी ग्राहक चिनी बनावटीच्या वस्तूच खरेदी करत आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव