विक्रमगडमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश
By Admin | Updated: August 6, 2015 01:25 IST2015-08-06T01:25:34+5:302015-08-06T01:25:34+5:30
तालुक्यातील साखरे हनुमान टेकडीच्या जंगलात एक अज्ञात (फरार) भोंदूबाबांच्या झोपडीत पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असून

विक्रमगडमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश
विक्रमगड : तालुक्यातील साखरे हनुमान टेकडीच्या जंगलात एक अज्ञात (फरार) भोंदूबाबांच्या झोपडीत पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असून, त्यात मानवी कवट्या,सांगाडे आणि तलवारी, काडतुसे, १ हजार आणि ५०० च्या पोताभर नकली नोटा, आणि पुजा साहित्य जप्त करण्यात आले. मात्र, भोंदुबाबा व त्याचे साथीदार आगोदरच फरार झाले होते. फक्त तेथे काम करणारे सेवेकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून, या बाबतचा अधिक तपास पोलीस निरिक्षक एन. एन. नंदवाळकर हे करीत आहेत.तालुक्यातील साखरे या गावाच्या देहर्जे नदीच्या टेकडीवर जंगलात या भोंदुबाबाचे हे उद्योग गेल्याअनेक दिवसापासून सुरू होते. हा भोंदुबाबा चलनी नोटाचा पाऊस पाडीत असे अशी बतावणी करून जादुटोण्याचा आव आणून लोकांची फसवणूक करीत होता. काही दिवसापुर्वी साखरे परिसरात पुरलेल्या शवांना बाहेर काढून त्यांच्या डोक्याच्या कवट्या, मनुष्याची हाडे याचा वापर तो जादुसाठी करीत असे. ज्यावेळी पुरलेले शव उकरून काढण्याचे ग्रामस्थांना कळले तेव्हा, शोध घेतल्यानंतर या बाबाच्या कामगीरीचा पर्दाफाश झाला. याबाबत विक्रमगड पोलीसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपीचा तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)