शिक्षकांचे उपोषण मागे

By Admin | Updated: April 25, 2017 01:14 IST2017-04-25T01:14:29+5:302017-04-25T01:14:29+5:30

पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्य कर्मचारी भरती केल्याच्या विरोधात पुकारलेले लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले

Behind teachers fasting | शिक्षकांचे उपोषण मागे

शिक्षकांचे उपोषण मागे

अलिबाग : पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्य कर्मचारी भरती केल्याच्या विरोधात पुकारलेले लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन रायगडच्या उपनिबंधकांनी दिल्यावर हे उपोषण स्थगित केल्याचे प्रसिध्दी पत्रक देण्यात आले आहे.
पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी लि. पेण या संस्थेच्या संचालक मंडळाने २०१६ यावर्षी कर्मचारी अनुशेष भरती नियमबाह्य केली असल्याने त्या विरोधात १६ जुलै २०१६ रोजी राजेंद्र धोत्रे (शाळा कर्जत), मोहनसिंग राठोड (शाळा पोलादपूर) यांनी सहकार राज्यमंत्री, सहकारी निबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग कोकण भवन यांच्याकडे याबाबतची चौकशी व्हावी अशी लेखी तक्र ार केली होती. या तक्र ारी बाबत राज्यमंत्री सहकार आणि सहनिबंधक कोकण भवन यांनी उपनिबंधक सहकारी संस्था अलिबाग, सहाय्यक निबंधक पेण यांना तसे लेखी पत्राद्वारे कळविले होते. मात्र त्या पत्राला केराची टोपली दाखवत पेण सहाय्यक निबंधक यांनी कोणतीही चौकशी केली नाही. कोणत्याही प्रकारचा अहवालही दिला नाही. याबाबतचा अहवाल प्राप्त न झाल्यास एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचे लेखी पत्र १३ एप्रिल रोजी धोत्रे व राठोड यांनी अलिबागच्या उपनिबंधकांना दिले होते. उपनिबंधकांनी चार ते पाच दिवसात या पत्राची चौकशी करु न आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Behind teachers fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.