कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाच मृत्यू

By वैभव गायकर | Updated: February 15, 2025 14:45 IST2025-02-15T14:44:34+5:302025-02-15T14:45:18+5:30

या घटनेत एकाची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

bees attack tourists in karnala sanctuary one dead | कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाच मृत्यू

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाच मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर दि.15 रोजी मधमाशानी हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेत सात ते आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कर्नाळा अभयारण्यातच उपचार सुरु आहेत.  या घटनेत एकाची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी,रविवारी कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.रविवारी माटुंगा येथील व्ही जे टी आय येथील कॉलेजची  मुले ट्रेकिंग साठी कर्नाळा किल्ल्यावरती आले असता त्यांच्यावरती मत माशांनी हल्ला केला आहे .सकाळी 11 च्या दरम्यान हि घटना घडली.सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.कर्नाळा अभयारण्याचे अधिकारी नारायण राठोड यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.अभयारण्यात विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.पनवेल उपजिल्हा या घटनेतील मृतदेह ठेवण्यात आले आहे.

Web Title: bees attack tourists in karnala sanctuary one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल