पेट्रोल भरण्यासाठी सुटे पैसे नसल्याने हाल
By Admin | Updated: November 10, 2016 03:38 IST2016-11-10T03:38:18+5:302016-11-10T03:38:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्याकरिता अचानक घेतलेला ५०० आणि १००० रुपयांची नोटा बंदीची निर्णयाने बुधवारी ग्रामीण भागात तसेच

पेट्रोल भरण्यासाठी सुटे पैसे नसल्याने हाल
दासगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्याकरिता अचानक घेतलेला ५०० आणि १००० रुपयांची नोटा बंदीची निर्णयाने बुधवारी ग्रामीण भागात तसेच शहरा ठिकाणच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला. सामान्य गोरगरीब जनतेकडे पाचशेच्या नोटा असल्याने या निर्णयामुळे मोठे हाल झाले.
१००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बंद करणचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांपासून धनदांडग्यांचे चांगलेच धाबे दणाणले असले तरी प्रत्यक्षात बाजारा सुट्या पैशाची चणचण असल्याने या निर्णयाचा फटका बाजारपेठेत तसेच ग्रामीण भागातील दुकानांमध्ये जाणवला. संपूर्ण तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी याच विषयाची चर्चा सुरू होती. सर्वसामान्यांकडे १००० आणि ५०० च्या नोटा असल्याने दिवसभरात कोणीच सुट्टे पैसे देण्यास तयार नव्हता. बँका आणि एटीएम मशीन बंद असल्याने दिवसभरात दैनंदिन गरज भागविण्यासाठी लागणारे किराणा माल घेणे देखील मुश्कील झाले होते.
शासनाने पेट्रोल पंपावर तीन दिवस नोटा चालतील असे जाहीर असले तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपात देखील सुट्टे पैसे नसल्याने पेट्रोल न भरताच नागरिकांना निघून जावे लागत होते. हिच अवस्था बाजारामध्ये दिसून येत होती. अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांचेच हाल झाले. बाजारपेठेत दुकानदारांनी देखील नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने दिवसभरात सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. ग्रामीण भागातील मजूरवर्ग तसेच आदिवासी समाज जो दर दिवशी पैशाची मोड करून ५० ते १०० रचे सामान घेतो. मात्र सुट्या पैशाअभावी दुकानदारांकडून यांना सामान देण्यात येत नव्हते. अनेक ग्राहकांना निराश होवून घरी परत जावे लागले. तर काही दुकानदारांनी ओळखीच्या ग्राहकांना चक्क उधारीतच सामान देण्याचे काम केले. मात्र आजच्या या नोटा बंद वर गोरगरीब नागरिकांना चांगलाच फटका बसल्याने सरकारच्या निर्णयावर निराशा व्यक्त करण्यात आली.
१०००, ५०० च्या नोटा बंद निर्णयाचे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली. मंगळवारी संध्याकाळपासून मेसेज व्हायरल झाल्याने रात्री १२ वा. पर्यंत प्रत्येक बँकांच्या समोर पैसे भरण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. मात्र मेसेज नागरिकांना घाबरवण्याचे तसेच दिशाभूल करणारे संदेश टाकले गेल्याने सर्वच हडबडले होते. ज्यांच्याकडे अशा नोटा आहेत. त्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र सोशल मिडियावर दिशाभूल करणाऱ्या या संदेशामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होवून घबराट पसरली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत झाले आहे. मात्र हा निर्णय घेतानार् प्रथम बाजारात लहान नोटा चलनात आणल्या पाहिजे होत्या, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात होते.
नोटा बंदीचा व्यापारावर ५० ते ६० टक्के परिणाम
1तळा : अचानकपणे चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याने व्यापारावर ५० ते ६० टक्के परिणाम झाला आहे. परंतु हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजू सप्रे, उपाध्यक्ष बी. के. पटेल यांनी व्यक्त केली. सरकारचा निर्णय ग्रामीण भागात लवकर पोहोचत नाही. मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडे ५००, १००० रुपयांच्या नोटा असतात. सर्वच व्यापारी त्या नोटांचा स्वीकार करत नाहीत. 2एसटी स्थानक प्रमुख आर. डी. जाधव व कंडक्टर वाय. जी. शिर्के म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शक्यतो ५०० व १००० च्या नोटा स्वीकारू नये. त्यातूनही आपणाकडे सुटे पैसे देण्यास असतील तरच स्वीकारा असे सांगितल्याचे स्पष्ट के ले.आज दिवसभर प्रवासात तशी काही अडचण आली नाही. प्रवासी शक्यतो सुटेच पैसे देत होते.त्यामुळे काहीच वादा वादी झाली नाही. झालेला निर्णय योग्य आहे असे त्यांनी सांगितले. 3पेट्रोल पंपावर ही पेट्रोल मिळत होते. ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेत असल्यामुळे काही ही अडचण आली नाही. मात्र सुटे पैसे नसल्यामुळे वेळप्रसंगी ग्राहकांना ५०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागत होते, मात्र याचा कोणीच विरोध के ला नाहीअशी प्रतिक्रिया अहमद मणेर यांनी सांगितले. तर मोबाईल रिचार्ज मारणेसाठी गेलेल्या ग्राहकांना त्रास होत नव्हता परंतु धंद्यावर त्याचा परिणाम जाणवत होता, असे मालक जयदास पायगुडे सांगितले. 4 आज पोस्टात नोटा जमा करण्यासाठी गर्दी झाली होती. परंतु आर्थिक व्यवहार बंद असलेमुळे नोटा जमा करून घेता आल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया पोस्ट मास्तर श्रीकांत मेतरे यांनी दिली. दररोज होणाऱ्या व्यापारापेक्षा आज व्यापार ४० ते ५० टक्केनी कमी झालेला पहावयास मिळत आहे. थोडी गैरसोय ग्राहकांची झाली पण नेहमी प्रमाणे ग्राहक ५००, १००० नोटा चलनात आणत होते. त्यांना समजावून सांगितल्यानंतर काहीच तक्रार नाही. 5भ्रष्टाचाराला या निर्णयाने आळा बसेल अशी प्रतिक्रिया व्यापारी अभिजित मेकडे यांनी दिली. तर सरकारचा निर्णय योग्य आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला या निर्णयाने आळा बसेल. थोडे दिवस गैरसोय होईल. थोडा त्रास होईल पण अगदी योग्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया अशरफ खेरटकर नागरिकाने दिली आहे. नेहमीप्रमाणे आज बाजारात व्यवहार होताना दिसले नाहीत, अशी प्रतिक्रिया राजू सपे्र व्यापारी असोशिएशन अध्यक्ष यांनी दिली.