दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:08 AM2019-11-15T02:08:04+5:302019-11-15T02:08:06+5:30

सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे.

The beach sunlight, fear of the loss of forest resources due to the wave of waves | दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

Next

अभय पाटील
बोर्ली पंचतन : सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. त्यामुळे किनाºयावरील सुरू, केतकी तसेच अन्य वनसंपदा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दिवेआगर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये केव्हा धडकेल याचा आता नेम राहिलेला नाही. दिवेआगर समुद्रकिनारी मागील काही वर्षांपासून संरक्षक बंधारा बांधण्याच्या आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या. प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक निधी केव्हा येणार व संरक्षक बंधारा केव्हा होणार याच प्रतीक्षेत सागरप्रेमी व दिवेआगर ग्रामस्थ आहेत.
दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पश्चिमेला असणाºया अरबी समुद्रामुळे व गावाला नारळ, सुपारीच्या लाभलेल्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण बागा यामुळे या किनाºयावर पर्यटक वीकेण्ड व सुट्टीची मौजमजा करण्यासाठी नेहमीच येत असतात. मात्र, समुद्रामध्ये होत असलेले भराव, सततची येणारी वादळे यामुळे भयंकर उसळणाºया लाटा यामुळे सुरूच्या झाडांची वनराई, केतकीच्या झाडांची वने, त्याचप्रमाणे इतरही औषधी व महत्त्वाची झाडे नष्ट होत आहेत. यासाठी समुद्रकिनारी अद्यापही कोणत्याही प्रकारे संरक्षक बंधारा नसल्याने ही धूप दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. दिवेआगरचा समुद्रकिनारा सुमारे तीन कि.मी. लांबीचा आहे, त्या ठिकाणी मोठा निधी खर्ची घालून उत्तम बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री यांनी संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटींच्या निधीची घोषणा केली; परंतु त्या घोषणेचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिज्ञ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही दिवेआगर येथील याच संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटी रुपये मिळून देण्याची घोषणा केली आहे. दिवेआगर समर्थ पाखाडी बाजूचा भाग हा समुद्रकिनाºयाला लागून असल्याने समुद्राची अशीच धूप होत राहिल्यास समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्यास वेळ लागणार नाही.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने किनाºयावर बांधलेले वॉच टॉवरही लाटांच्या माºयाने जमीनदोस्त झाला आहे. लोखंडी असलेला हा वॉच टॉवर आवश्यक असून, लोखंडी ऐवजी मजबूत काँक्रीटीकरणाचा बांधण्याची मागणी होत आहे.
>पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा तर केंद्राच्या सागरी योजनेतून आणखी भरघोस निधी आणण्याचे प्रयत्न रायगडचे खासदार तसेच आमदार यांचे आहेत.
- उदय बापट, सरपंच, दिवेआगर

Web Title: The beach sunlight, fear of the loss of forest resources due to the wave of waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.