वायुगळतीची दोन कामगारांना बाधा

By Admin | Updated: January 9, 2017 04:48 IST2017-01-09T04:48:00+5:302017-01-09T04:48:00+5:30

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सेल इंडस्ट्रिज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात रविवारी सकाळी डी.टी.सी. या

Barrier to two workers | वायुगळतीची दोन कामगारांना बाधा

वायुगळतीची दोन कामगारांना बाधा

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सेल इंडस्ट्रिज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात रविवारी सकाळी डी.टी.सी. या प्लॅन्टमध्ये वायुगळती झाली. या वायुगळतीची दोन कामगारांना बाधा झाली आहे. रमेश ठाकूर व नंदू रुळेकर अशी या दोन कामगारांची नावे आहेत. रात्रपाळीत डी.टी.सी. प्लॅन्टमध्ये पंपामधून लीकेज झालेले डी.टी.ए. हे रसायन सर्वत्र पसरल्याने दोन कामगारांना या वायुगळतीमुळे बाधा झाली. त्यांना त्वरित खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचाराकरिता आणण्यात आले. डॉक्टरांनी निदान केल्यानंतर, या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती व्यवस्थापक मंचेकर यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Barrier to two workers