शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील बँकांना पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:48 IST

स्टेट बँकेची कॅश भिजली; चार दिवस व्यवहार राहणार बंद

दासगाव : महाड तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आणि तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. पुराचे पाणी शहरात दाखल झाल्याने पुराच्या पाण्यात या बँका देखील सुटल्या नाहीत. महाडमधील राष्ट्रीयकृत बँका असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही बँकांची यंत्रणा पुराच्या पाण्यात भिजल्याने किमान चार दिवस या बँका बंद राहणार आहेत. यातील स्टेट बँक आॅफ इंडियाची किमान चार लाखांची कॅश भिजली गेली. बँक आॅफ इंडियाचे काही व्यवहार उद्या सुरू होतील, अशी माहिती दिली आहे.महाड शहरात पुराच्या पाण्याने काही ठिकाणी पाच फुटांची पातळी गाठली होती. यामुळे दुकाने, बैठी घरे, जुन्या इमारतीमधील पहिला मजला यामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. शहरातील पूर ओसरल्यानंतर अनेकांना पैशाची गरज भासते. मात्र, महाडमधील स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयकृत बँका पाण्याखाली आल्या होत्या. यामुळे दोन्ही बँकांचे व्यवहार ठप्प झाले. बँकांमधील कागदपत्रे, संगणकीय यंत्रणा, एटीएम, प्रिंटर आणि फर्निचर आदी साहित्य भिजले गेले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील सर्व सामान बाधित झाले असून जवळपास ४ लाख कॅश भिजली, तर पंधरा लॉकर, संगणकीय यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे ही बँक आठवडाभर बंद राहण्याची शक्यता असल्याचे बँकेचे सर्व्हिस व्यवस्थापक महेंद्र कपडेकर यांनी सांगितले.बँक आॅफ इंडियामधील कर्मचाऱ्यांनी बँकेतील काही सामान पाणी भरण्यास सुरवात होताच सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली, यामुळे बँकेतील काही यंत्रणा सुरक्षित राहिली. बँकेत किमान तीन फूट पाणी पातळी होती. यामुळे फर्निचर आणि कागदपत्रे पाण्यात बुडाली. बँक दोन दिवसातच पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता बँक अधिकारी सतीश पाडावे यांनी दिली. याचबरोबर महाडमधील मुरली मनोहर सहकारी बँकेच्या शिवाजी चौक शाखा तसेच अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप. अर्बन बँकेत देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.बँका सुरक्षित स्थळी कधी जाणार?महाडमध्ये पूर हा प्रतिवर्षाचा आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर शासनाने काही निर्देश दिले होते. महाडमधील शासकीय कार्यालये, बँका सुरक्षित स्थळी किंवा किमान पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, आजतागायत याबाबत बँका निष्काळजी राहिल्या आहेत. गेली अनेक वर्षे या बँका एकाच ठिकाणी आहेत. ज्या भागात पूर येण्याची अधिक शक्यता आहे अशा ठिकाणी या बँका असल्याने या पुरात देखील या बँका पाण्याखाली गेल्या. अद्याप बँका सुरक्षित स्थळी नेण्याबाबत कोणताच निर्णय बँक प्रशासनाकडून घेण्यात आला नसल्याची माहिती दोन्ही बँक अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :bankबँकRainपाऊस