सोलणपाडा धबधब्यावर मद्यास बंदी
By Admin | Updated: August 29, 2015 22:13 IST2015-08-29T22:13:51+5:302015-08-29T22:13:51+5:30
तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात

सोलणपाडा धबधब्यावर मद्यास बंदी
कर्जत : तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात टाकण्यात येतो. त्यामुळे धबधबा परिसरात मद्य नेण्यास ग्रामपंचायतीकडून बंदी घालण्या आली आहे.
टेंभरे ग्रामपंचायत आणि सोलणपाडा - जामरुंग येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेवून हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.
सोलणपाडा येथील पाझर तलावावर यंदा किमान दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ते आपली वाहने घेवून येत असताना कोणतेही नियम पाळत नसल्याने शनिवार आणि रविवारी वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. यासाठी टेंभरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी पार्र्किंगसाठी जागा निश्चित केली आहे. कोणतेही वाहन हे सोलणपाडा गावाच्या बाहेर पाझर तलावाकडे जाणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे.
पाझर तलावाची मालकी असलेल्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांना यावेळी बोलविण्यात आले. त्यांनी प्रथम वाहतूक नियोजन आणि पर्यटक घेऊन येणारे मद्य यावर चर्चा झाली. त्यातून जामरु ंग येथे जाताना सर्व वाहने पोलिसांच्या मदतीने तपासून कोणीही मद्य घेऊन जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन झाले आहे. ग्रामस्थांकडून आता वाहनांबाबत योग्य नियोजन करण्यात येत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने मजूर लावले आहेत.