शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

गोरेगावमधील उजव्या सोंडेचा जागृत पोवळ्या गणपती

By admin | Updated: June 13, 2017 02:54 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोणेरेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोरेगाव शहरास नवसाला पावणाऱ्या तब्बल १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या गणपतीमुळे एक

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोणेरेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोरेगाव शहरास नवसाला पावणाऱ्या तब्बल १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या गणपतीमुळे एक अनोखी परंतु फारशी कुणाला माहीत नसलेली ओळख आहे. पोवळ्यातील ही गणेशमूर्ती संपूर्ण राज्यातील एकमेव गणेशमूर्ती असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची माहिती गोरेगावमधील ७१ वर्षांचे गणेशभक्त प्रफुल्ल खुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘पोवळे’ अर्थात यास प्रवाळ असेही म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्यास ‘विद्रुम’, हिंदीमध्ये ‘मूँगा’ तर इंग्रजीमध्ये त्यास ‘रेड कोरल’असे म्हटले जाते. पोवळ्याला जगभर दागिन्यांसाठी मोठी मागणी आहे. भारतातील प्रचलित समाजांमध्ये प्रवाळाचे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी महत्त्व सांगितले जाते. दागिन्यांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ किंवा पोवळे हे साधारणपणे लाल रंगाचे असते. प्रवाळ मिळवण्यासाठी समुद्रात खोल जावे लागते. गोरेगावमधील श्री अमृतेश्वरी गायत्री देवी मंदिराच्या समोरच असलेल्या दीपमाळेच्या पायथ्याला या अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या पोवळ््याच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना गोविंद लक्ष्मण शास्त्री रानडे यांनी केल्याची माहिती खुळे यांनी दिली. मुळात श्री अमृतेश्वरी गायत्री देवीची स्थापना गोविंद लक्ष्मण शास्त्री रानडे यांनी तब्बल १०३ वर्षांपूर्वी १९०४ मध्ये वैशाख शुद्ध सप्तमी शके १०२६ रोजी केली. त्यानंतर लगेच येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या पोवळ््याच्या गणपतीची स्थापना त्यांनीच केल्याचे खुळे यांनी सांगितले. पोवळ््याचा हा उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत जागृत देवस्थान असून, तो नवसाला हमखास पावणारा गणपती असल्याचे खुळे यांनी सांगितले.गोरेगाववासीयांचे श्रद्धेचे दैवत दररोज पूजाअर्चा करण्याकरिता येथे पुजाऱ्यांची व्यवस्था आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या गणपतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. गोरेगाववासीयांच्या श्रध्देचे दैवत असणारा हा पोवळ््याचा गणपती आतापर्यंत प्रसिद्धपासून फार दूर राहिला आहे. मात्र ज्या-ज्या गणेशभक्तांना याबाबतची माहिती आणि प्रचितीचे अनुभव समजतात असे गणेशभक्त शोध घेत येथे दर्शन आणि नवस करण्याकरिता पोहोचतात असे खुळे यांनी सांगितले.महाराष्ट्रातील १०३ वर्षांच्या प्राचीन पोवळ्याच्या उजव्या सोंडेची गणेशमूर्ती.