खंडेरायावर विराजमान बाप्पांनी वेधले भक्तांचे लक्ष
By Admin | Updated: May 22, 2016 02:15 IST2016-05-22T02:10:51+5:302016-05-22T02:15:46+5:30
पेणच्या गणेशनगरीतून मूर्तीकार नेहमीच बाप्पाची विविध रुपे साकारत असतात. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी साकारण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे

खंडेरायावर विराजमान बाप्पांनी वेधले भक्तांचे लक्ष
पेण : पेणच्या गणेशनगरीतून मूर्तीकार नेहमीच बाप्पाची विविध रुपे साकारत असतात. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी साकारण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्राचा कुळाचार, कुळधर्माची देवता जेजुरी गडावरचा मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या रुपातील शिवशंकर आणि त्यांच्या खांद्यावर विराजमान झालेले गणपती बाप्पा अशी ही चार फूटी अर्धपुतळाकार मूर्ती येथील कलाकेंद्रात साकारण्यात आली आहे. या मूर्तीला भक्तांकडूनही मोठी पसंती मिळत आहे.
देवाच देवपण भक्ताप्रती नि:सीम श्रध्दा, भक्ती स्रेहभाव यामधून प्रतीत होतो. कोटी, कोटी रुपे तुझी, कोटी चंद्र, सूर्य तारे, या नभमंडळात या शक्तीरुपात देवताचा संचार सुरु असून या सर्वाचा अधिपती, नायक श्रीगणेश आहे. त्यामुळे नाटक, चित्रपट, मालिका, अथवा पौराणिक ग्रंथाचे संदर्भ घेऊन पेणमधील कलाकेंद्रातून मूर्तीकलेत त्यांची विविध रुपे साकारली जातात. गतवर्षी सिहांसनधिष्ठित विराजमान झालेल्या मल्हारीलाच बाप्पाच रुपे देण्यात आले होते.
(वार्ताहर)