लग्नाचे आमिष दाखवून तरु णीवर अत्याचार

By Admin | Updated: June 30, 2017 02:55 IST2017-06-30T02:55:21+5:302017-06-30T02:55:21+5:30

कोल्हापूर येथे राहणाऱ्या तरुणीस फेसबुकच्या साह्याने संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यात आला.

Atrocity on the young by showing lonely marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरु णीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरु णीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/ मुरुड : कोल्हापूर येथे राहणाऱ्या तरुणीस फेसबुकच्या साह्याने संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यात आला. याप्रकरणी आरोपीविरु द्ध मुरु ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय युवतीच्या फेसबुक व व्हाट्स-अ‍ॅपच्या माध्यमातून अहमदनगर येथे राहणारा रवी कोलपे (२८)यांनी सातत्याने पाठपुरावा करून, या युवतीशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझ्याशी लग्न केले नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करेन, अशा पद्धतीने या तरु णाने चांगलेच संबंध प्रस्थापित केले. मी तुझ्याशीच लग्न करेन, असेसुद्धा त्याने तिला आश्वासित केले होते. ही तरुणी पेट्रो केमिकल इंजिनीअर असून, तिने परदेशात नोकरी केली आहे.
या तरु णाच्या भूलथापांना बळी पडून ती तरु णी त्याच्याबरोबर शिर्डी, नागाव व मुरु ड तालुक्यातील काशीद या ठिकाणी फिरली. काशीद येथे एका लॉजमध्ये तरु णीच्या इच्छेविरु द्ध शारीरिक संबंध करून तिथून पळ काढला. या वेळी आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच, या तरु णीने मुरु ड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल के ली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुरु ड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे पुढील तपास करीत आहेत. अशा प्रकारे सोशल मीडियावर मैत्री करताना योग्य चौकशी करावी, असे आवाहन पोलिसांनी के ले आहे.

Web Title: Atrocity on the young by showing lonely marriage