खालापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:06 IST2019-03-27T00:05:51+5:302019-03-27T00:06:04+5:30

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करून लग्नास नकार देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.

 Atrocity on the woman by showing a lover of marriage in Khalapur | खालापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

खालापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

वावोशी : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करून लग्नास नकार देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणीचे सचिन मोहिते (२४, रा. परळी, सुधागड) बरोबर आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. पीडित तरुणीला सचिनने लग्नाचे वचन देत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर सचिनने तिला, तू लग्नापूर्वी गर्भवती राहिली म्हणून तुझी समाजामध्ये बदनामी करीन, अशी धमकी देऊन तिच्या संमतीविना गर्भपात घडवून आणला होता. त्यानंतर देखील तरुणीला लग्न करतो, असे सांगून वेळोवेळी शरीर संबंध केले होते. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सचिनने तिला आईवडिलांना भेटण्यासाठी खालापूर येथील शिवाजी चौकात बोलावले, त्या वेळी तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार फोनवरून घरी सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल के ली. सचिन मोहिते विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सचिनला न्यायालयात हजर केले असता २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला सपोनि ज्योती कांबळे या करीत आहेत.

Web Title:  Atrocity on the woman by showing a lover of marriage in Khalapur

टॅग्स :Raigadरायगड