शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती आल्यास मदत कोणाकडे मागायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:51 IST

नागरिकांचा प्रश्न : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचा बोजवारा

अलिबाग : पावसाळा सुरू झाला की, सर्वांनाच आपत्तीची चिंता लागते. आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आपत्तीच्या कालावधीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष कार्यान्वित केलेला आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना फोन केला असता तो उचलला जात नव्हता. त्याचप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनीही नुसताच खणखणत होता. त्यामुळे जिल्ह्यावर आपत्ती आलीच तर मदत नेमकी कोणाकडे मागायची, असा प्रश्न आहे.

रायगड जिल्ह्याला आपत्तीचा इतिहास आहे. जांभुळपाडा येथे १९८९ साली पूर आल्याने सर्वत्रच हाहाकार उडाला होतो. शेकडो माणसे त्यामध्ये मारली गेली होती, तर अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदी पूल दुर्घटनेत सुमारे ३० नागरिकांना मृत्यूने कवटाळले होते. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रासायनिक कंपन्यांचे जाळे आहे. या ठिकाणी सातत्याने छोटे-मोठे अपघात होतच असतात. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे असे दळणवळणाचे महत्त्वपूर्ण मार्ग जातात. या मार्गावर अपघात होत असतात. मुरुड येथे २३ विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. जिल्ह्यात साथीचे रोगही पसरत असतात. पावसाळ्यात आपत्तीचा धोका अधिक असल्याने जिल्हा नेहमीच अलर्टवर असतो.

आपत्तीच्या कालावधीत तातडीने मदत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. याच कारणासाठी सरकारने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग सुरू करून आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याची नेमणूक केली. सागर पाठक सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही स्थापन केलेला आहे. पावसाळ्यात हा कक्षही २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. रविवारी मोठ्या संख्येने अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पर्यटक आले होते. आपत्तीचा विभाग हा २४ तास सजग असला पाहिजे. मात्र, रविवारी पाठक यांना त्यांच्या मोबाइलवर ४ वाजण्याच्या सुमारास फोन केला असता नुसतीच रिंग होत होती. पाठक यांचा फोन उचलला जात नव्हता. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षातील दूरध्वनीदेखील नुसताच वाजत होता. त्यामुळे एखाद्याला मदत पाहिजे असल्यास ती कशी आणि कधी पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला.आपत्ती विभागामार्फत मॉकड्रिल घेतले जाते. त्यामध्ये खोटी आपत्ती आणून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, आरोग्य, अग्निशमन यंत्रणा किती वेळात पोहोचतात, याची माहिती घेतली जाते; परंतु रविवारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्षावरच आपत्ती आल्याचे दिसून आले.‘संकटात मदत करण्याची जबाबदारी सरकारची’आपत्तीही सांगून कधीच येत नाही, यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे असते. अशा कालावधीत नागरिकांना संकटात मदत करण्याची जबाबदारी सरकारची म्हणजेच प्रशासनाची आहे. त्यांच्याच विभागाची अशी अवस्था असेल तर नागरिकांनी आपत्तीच्या कालावधीत कोणाची मदत मागायची, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग