शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर

By निखिल म्हात्रे | Updated: May 5, 2024 23:52 IST

ऑडिओ क्लीप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात इसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोशल मिडीयावर जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल आणि मिडीया सेल च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे. सोशल मिडीया (व्हॉट्सअप) वर लोकसभा 2024 च्या अनुषंगाने आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात ईसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुक 2024 चे पार्श्वभुमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीया मॉनेटरिंग करण्याकरीता सोशल मिडीया सेल स्थापन करण्यात आलेला असुन त्याव्दारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व टियूटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे नेत्यांनी केलली भाषणे व त्या अनुषंगाने लोकांनी केलेली टीका टिप्पणी तसेच वॉट्सप ग्रुपवर लोकांनी व्हिडीओ,ऑडीओ व इतर प्रकारे केलेल्या पोस्ट या ऐकुन पाहुन व वाचन करून त्या मधील आक्षेपाहर्य पोस्ट मिळून आल्यास त्यावर योग्यती कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोशल मिडीया लॅबब्दारे मॉनिटरींग करण्यात येते.

4 मे रोजी सायं. 5 वाजण्याचे सुमारास सोशल मिडीया मॉनेटरिंग करीत असताना गोपनिय सुत्राकडून एक ऑडीओ क्लीप आढळून आली. या ऑडीओ क्लीप मध्ये  दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असल्याचे आढळून आले. या ऑडीओ क्लीप मधील आवाज विशिष्ट समाजाला भडकावुन सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे आहे. सदर अज्ञात इसमाविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 505(2) सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्ह्याचा तपास  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे यांचेकडुन सुरू करण्यात आलेला आहे. सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण करण्याऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट करू नये, असे निर्देशनास आल्यास संबंधीत व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४raigad-pcरायगडPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४