गोरेगाव येथे समता रथाचे आगमन

By Admin | Updated: February 22, 2016 00:41 IST2016-02-22T00:41:40+5:302016-02-22T00:41:40+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. आंबेडकरांचे मूळ गाव अंबवडे येथून रथयात्रेचे आयोजन करण्यात

The arrival of Samata Ratha in Goregaon | गोरेगाव येथे समता रथाचे आगमन

गोरेगाव येथे समता रथाचे आगमन

माणगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. आंबेडकरांचे मूळ गाव अंबवडे येथून रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रथयात्रेचे गोरेगाव येथे आगमन झाले.
गोरेगाव येथे स्वागतासाठी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी, सरपंच किंवा कोणीही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हते. गोरेगाव एस.टी. स्टँडवर महाड येथील शासकीय वसतिगृहातील मुलींनी ‘पाणीटंचाई’ या विषयावर पथनाट्य सादर करून त्याची कारणे, परिणाम व उपाययोजनांची माहिती दिली. भीम गीते, क्र ांती गीते सादर केली. मुलांनी एकलव्य आणि दोन या पथनाट्यातून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महाड येथील मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल सुधा सावंत, मदतनीस अनुराधा सकपाळ ,आर .एस.पवार व घाग उपस्थित होते. समतादूत संग्राम कासले, दत्ता गायकवाड व निकिता मोरे यांनी रथयात्रेच्या आयोजनाची माहिती देऊन पुढील कार्यक्र माची रूपरेषा सांगितली. सोमवारी लोणेरे विद्यापीठ, मंगळवारी दाखणे व बुधवारी माणगाव येथे रथयात्रा येणार असल्याचे सांगितले . एका महिन्यापूर्वी या कार्यक्र माची माहिती कळवूनही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीं गैजर होते. (वार्ताहर)

Web Title: The arrival of Samata Ratha in Goregaon