जिल्ह्यात अवेळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत
By राजेश भोस्तेकर | Updated: March 21, 2023 08:45 IST2023-03-21T08:44:07+5:302023-03-21T08:45:32+5:30
अलिबागमध्ये सुरू झालेल्या पावसाने कांदा शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली.

जिल्ह्यात अवेळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग मध्ये सुरू झालेल्या पावसाने कांदा शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली. या अवेळी पावसाने आंबा, कांदा उत्पादक यांना फटका बसला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अवेळी पावसाचे आगमन झाले होते. यावेळी रोहा, कर्जत तालुक्याला मोठा फटका बसला होता. पुन्हा आज सकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आडोसा शोधावा लागला. कांदा उत्पादक शेतकरी याची कांदा वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. सुरू झालेल्या या अवेळी पावसाने शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. आधीच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे झालेले नाही आहेत. त्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"