अर्णब गाेस्वामींचा वीकेण्ड काेठडीतच; पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 02:29 AM2020-11-08T02:29:16+5:302020-11-08T02:29:25+5:30

सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.

Arnab Gaeswami's weekend in Kathmandu; Hearing on Paelis' review application on November 9 | अर्णब गाेस्वामींचा वीकेण्ड काेठडीतच; पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणी

अर्णब गाेस्वामींचा वीकेण्ड काेठडीतच; पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणी

Next

- आविष्कार देसाई

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता साेमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली.
सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.

आरोपी नितेश सारडा यांच्या वकिलांनी सरकार पक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज, तसेच पाेलीस काेठडीबाबत करण्यात आलेला आदेश मराठीत असल्याने, तो इंग्रजीमध्ये भाषांतरित करून मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला. सारडा हे पश्‍चिम बंगालचे राहणारे आहे, तसेच मारवाडी आहेत. त्यांना मराठी कळत नाही, त्यामुळे अर्ज इंग्रजीमध्ये देण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. या न्यायालयाची भाषा मराठी आहे. आरोपीचे वकील हेही महाराष्ट्रातीलच आहेत. त्यांची भाषाही मराठीच आहे, तसेच पाेलीस काेठडी मिळावी, या पाेलीस काेठडी कामी नितेश सारडाच्या वकिलांनी पाेलीस काेठडीबाबतचा अहवाल मराठीत असतानाही युक्तिवाद मराठीत केला. तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे केवळ पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज इंग्रजीमध्ये भाषांतरित करून मिळण्याची सारडा याच्या वकिलांची मागणी फेटाळण्याची विनंती अ‍ॅड.घरत यांनी केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी नितेश सारडा यांच्या वकिलांचा अर्ज फेटाळून लावला.

पुढील मुदत मिळण्याचा अर्ज 
 त्यानंतर, न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या वकिलांनी पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्जावरील आजची सुनावणी स्थगित करून सुनावणीकरिता पुढील मुदत मिळण्याचा अर्ज केला.
 त्यावर युक्तिवाद करताना तिघांच्याही वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल याचिका प्रलंबित असल्याने, आजची होणारी सुनावणी स्थगितची विनंती केली. 
सत्र न्यायालयाने ९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली. गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील ९ नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

Web Title: Arnab Gaeswami's weekend in Kathmandu; Hearing on Paelis' review application on November 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.