उरण नगर परिषदच्या मुख्याधिकारीपदी समीर जाधव यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 15:14 IST2023-12-05T15:14:19+5:302023-12-05T15:14:31+5:30
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची वर्षभरापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती.

उरण नगर परिषदच्या मुख्याधिकारीपदी समीर जाधव यांची नियुक्ती
- मधुकर ठाकूर
उरण : उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची मुदतपूर्वच माथेरान येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या समीर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी (५) दोघांच्याही पदमुक्त आणि पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला.
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची वर्षभरापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मनमिळावू, मितभाषी ,पारदर्शक कारभारामुळे कामगार आणि जनमानसात त्यांनी चांगली छाप पाडली होती.बिल्डर लॉबीलाही त्यांनी दूर ठेवणेच पसंत केले होते.मात्र त्यांची मुदतीआधीच माथेरान येथे बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या समीर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी (५) एकाचवेळी दोघांच्याही पदमुक्त आणि पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या या सोहळ्याला कर्मचारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.