शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे आवाहन
By Admin | Updated: May 9, 2017 01:28 IST2017-05-09T01:28:57+5:302017-05-09T01:28:57+5:30
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत शेती उत्पादन व शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाची बचत करण्यासाठी श्रीवर्धनमधील

शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
दांडगुरी : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत शेती उत्पादन व शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाची बचत करण्यासाठी श्रीवर्धनमधील शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन श्रीवर्धन पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी हंबीर यांनी केले आहे.
कृषी अधिकारी यांनी खरीप हंगामासाठी पूर्वनियोजन करताना श्रीवर्धन गटातील ३५0 क्विंटल भात बियाणांची मागणी नोंदवली आहे. यावेळी रासायनिक खतांचा तुटवडा येऊ नये व शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने ४६६ मे. टन खताची मागणी करण्यात आली आहे.