अलिबागमध्ये बुधवारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

By निखिल म्हात्रे | Published: February 12, 2024 07:09 PM2024-02-12T19:09:17+5:302024-02-12T19:09:29+5:30

रायगड जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस ठाणे स्तरावर ‘व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर्स स्पर्धा व अकरावी व बाराच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Anti-drug awareness rally in Alibaug on Wednesday | अलिबागमध्ये बुधवारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

अलिबागमध्ये बुधवारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

अलिबाग - नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समिती, माणुसकी प्रतिष्ठान यांनी अमलीपदार्थ विरोधी जनजागृतीनिमित्त संकल्प नशामुक्तीचा, एक पाऊल नशामुक्तीच्या दिशेने’ या स्लोगनखाली प्रभात फेरीचे आलबागमध्ये आयोजन केले आहे. १४ फेब्रुवारीला सकाळी ७:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून ही फेरी निघणार आहे. अमली पदार्थाचे सेवन व दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

रॅलीचा मार्ग असा

जिल्हाधिकारी कार्यालय-पोलिस, पेट्रोलपंप-तांबोली हॉस्पिटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा एसटी स्टॅण्ड, मारुती नाका जिल्हाधिकारी कार्यालय, अशी रॅली काढण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स व निबंध स्पर्धा

रायगड जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस ठाणे स्तरावर ‘व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर्स स्पर्धा व अकरावी व बाराच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Web Title: Anti-drug awareness rally in Alibaug on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.