जिल्ह्यात नगर परिषदांची आरक्षणे जाहीर

By Admin | Updated: July 3, 2016 03:07 IST2016-07-03T03:07:08+5:302016-07-03T03:07:08+5:30

अलिबाग नगरपरिषदेच्या आठ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागांकरीता नेहा जाधव या बालीकेच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आलेल्या आरक्षण सोडती नूसार १७ जागांपैकी

Announcing the reservation of the city council in the district | जिल्ह्यात नगर परिषदांची आरक्षणे जाहीर

जिल्ह्यात नगर परिषदांची आरक्षणे जाहीर

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या आठ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागांकरीता नेहा जाधव या बालीकेच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आलेल्या आरक्षण सोडती नूसार १७ जागांपैकी ८ जागी सर्वसाधारण आरक्षण आले तर ९ जागी महिलांना संधी प्राप्त झाली आहे.
अलिबाग न.पा.च्या प्रभाग क्र.१ मध्ये अ- अनूसुचित जमाती महिला तर ब-सर्वसाधारण , प्रभाग क्र.२ मध्ये अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला तर ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.३ मध्ये अ-नामाप्र सर्वसाधारण तर ब सर्वसाधारम महिला, प्रभाग क्र.४ मध्ये नामाप्र सर्वसाधारण तर ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ मध्ये अ-अनूसुचित जाती राखीव सर्वसाधारण तर ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.६ मध्ये अ-नामाप्र महिला तर ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र.७ मध्ये अ-सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Announcing the reservation of the city council in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.