अंकिता मयेकरने पटकावले स्कॉट रौप्य पदक
By Admin | Updated: May 13, 2017 01:06 IST2017-05-13T01:06:03+5:302017-05-13T01:06:03+5:30
इंडोनेशिया येथे १ ते ५ मे २०१७ दरम्यान झालेल्या ‘२०१७-आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेमध्ये वरिष्ठ खुल्या गटात अलिबागच्या

अंकिता मयेकरने पटकावले स्कॉट रौप्य पदक
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : इंडोनेशिया येथे १ ते ५ मे २०१७ दरम्यान झालेल्या ‘२०१७-आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेमध्ये वरिष्ठ खुल्या गटात अलिबागच्या अंकिता मयेकर हिने चौथे स्थान पटकावले. स्पर्धेतील स्कॉट या प्रकारामध्ये १४५ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकविले आहे.
अंकिताची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. ती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून, सध्या फिनिक्स जिम रत्नागिरी येथे राज नेवरेकर, मदन भास्करे, चंद्रकांत घवाळी, शैलेश जाधव, सदानंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७-कॉमन वेल्थ स्पर्धेसाठी तिचा सराव सुरू आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी., निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार एस.के. भायदे, माजी तहसीलदार हरिश्चंद्र पिलणकर यांचे प्रोत्साहन मिळाले.