फणसाडमधील प्राण्यांची गणना सुरू
By Admin | Updated: May 11, 2017 02:09 IST2017-05-11T02:09:10+5:302017-05-11T02:09:10+5:30
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगावजवळील फणसाड अभयारण्यात बुधवारी गौतम बुध्द यांच्या जयंतीचे औचित्य

फणसाडमधील प्राण्यांची गणना सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा / मुरुड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगावजवळील फणसाड अभयारण्यात बुधवारी गौतम बुध्द यांच्या जयंतीचे औचित्य साधून फणसाड अभयारण्यातील प्राण्यांची गणना सुरू करण्यात आली.
सुमारे ५४ कि.मी. क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार आहे. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरु , पिसोरी, ससा, काळेमांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे.
तसेच या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष , १७ प्रकारचे सस्तन प्राणी, २७ प्रकारचे साप, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, ९० प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्लू मॉरमॉन, मॅप व आदी फुलपाखरु दिसून येतात, याबरोबर नाग, फुरसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, अजगर यासारखे बिनविषारी साप येथे आढळतात. या सर्व प्राण्यांची बुधवारपासून गणना केली जाते. गेल्या वर्षीपेक्षा प्राण्यांची वाढ झालेली दिसून येईल, असे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी यावेळी सांगितले.