शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

अंगणवाड्यांची दुरुस्ती जिल्ह्यात प्रगतिपथावर, ५२४ इमारतींची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:21 AM

५२४ इमारतींची दुरवस्था : १३५ कामे पूर्ण; प्रत्यक्षात १७९ कामे सुरू

आविष्कार देसाईअलिबाग : खासगी शाळांमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी असे विभाग सुरू केल्याने बहुतांश पालक आपल्या पाल्याला याच ठिकाणी शालेय संस्कार देण्याचा प्रयत्न करतात, मात्र ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी अशा शाळांची फी परवडणारी नाही. यासाठी सरकारमार्फत अंगणवाडी केंद्र सुरू करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला जात आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील ५२४ अंगणवाड्यांची दुरवस्था झाल्याने तेथील इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यातील प्रत्यक्षात १७९ कामे सुरू आहेत, तर १३५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील लहान मुलांना शाळेची गोडी लागावी, तसेच शालेय संस्कार होण्यासाठी अंगणवाड्यांची गरज निर्माण झाली होती. सरकार ती पूर्ण करत असली, तरी काही अंगणवाड्यांमधील पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरणे गरजेचे आहे. अंगणवाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. त्यामाध्यमातून तेथे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी पोषण आहार, शालेय पुस्तके, गणवेश, इमारती यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांकडे सरकारसह स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे अंगणवाड्यांच्या इमारती पाहिल्यावर दिसून येते, काही धोकादायक झालेल्या इमारती पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये लहान मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषदेने तातडीने ५२४ पडझड झालेल्या अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत. ५२४ पैकी १७९ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत, तर १३५ ठिकाणची कामे पूर्णही झाली आहेत. उर्वरित अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरुस्ती मार्चअखेरपर्यंत करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हा परिषदेकडून बांधकामच्ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी अंगणवाडीसाठी चांगल्या दर्जाच्या इमारती नव्याने उभारण्यात येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेकडून २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीतील तब्बल १०१ नव्याने अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. पैकी ३६ ठिकाणी कामे सुरू झाली आहेत, तर ११ अंगणवाड्यांच्या इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत.च्अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे, तसेच खासगी ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत तेथील मालकांना दुरुस्ती करण्याबाबत सूचना वेळोवेळी करण्यात येत असल्याचेही महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raigadरायगड