शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

आंबेत, टोल, दादली पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:31 AM

शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली.

- सिकंदर अनवारेदासगाव  - शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासनाकडून स्ट्रक्चरल आॅडिट किंवा अंडरवॉटर सर्वेक्षण न करता, फक्त मलमपट्टीसाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली.अधीक्षक अभियंता पूल विभाग यांच्या सर्वेक्षणानंतर हे तिन्ही पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत झाल्याचा सूचनाफलक लावण्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.बॅ. ए. आर. अंतुले यांनी ३४ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना, महाड शहरानजीक दादली, टोल पूल आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत पूल या तीन पुलांची उभारणी केली. त्यामुळे खाडीपट्ट्यातील अनेक गावे महाड शहराला जोडली गेली आणि या परिसरातील होडी मार्ग बंद होऊन एक वाहन मार्ग तयार झाला. परिणामी, दळणवळणाला चालना मिळून मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाला जोडण्यासाठी हे पूल महत्त्वाचे ठरले.गेल्या ३४ वर्षांत प्रशासनाकडून पुलावरील खड्डे भरणे, रेलिंगची कामे करणे, छोटी-मोठी डागडुजी यावर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र, एकदाही पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे लक्ष दिले नाही.सध्या या तिन्ही पुलांचा महाड सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत अधीक्षक अभियंता पूल विभाग यांच्याकडून सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेमध्ये तिन्ही पूल कमकुवत असून वाहतुकीस धोकादायक असल्याचे समोर आले आहे. मात्र, अशा प्रकारचा अहवाल महाड सा. बां. खात्याकडूनही वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला आहे. तिन्ही पूल धोकादायक असून अवजड वाहतुकीमुळे कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरीही वाहतूक सुरूचदोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन पुलांच्या सा. बां. खात्याने स्ट्रक्चरल आॅडिटनंतर धोकादायक स्थितीचा अहवाल शासनाला दिला आहे. तसा सूचनाफलकही पुलावर लावण्यात आला आहे.तिन्ही पुलांवरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत आहेत. पैकी दादली पूल हा महाडनजीक असल्याने वर्दळ जास्त असते. हजारो नागरिक पायी ये-जा करतात.सा. बां. खात्याच्या बोर्डनुसार एखादी अपघाती घटना घडली तर याला जबाबदार कोण? तसेच क्षमतेपेक्षा जादा वाहतुकीवर कोण निर्बंध घालणार? नुसता फलक लावून जबाबदारी झटकण्याचे काम बांधकाम विभागाने केले आहे.चाकरमान्यांना मनस्तापकोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून टोल, आंबेत मार्गे चाकरमानी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये येतात. मात्र, कमकुवत पुलाच्या भीतीने यंदा चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सध्या रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिक पुलावरून प्रवास टाळत आहेत. गणेशोत्सवातही चाकरमान्यांनी या मार्गे प्रवास टाळला तर त्यांना खेड मार्गे यावे लागेल.अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी स्वतंत्रपणे पुलांची पाहणी करून स्ट्रक्चरल आॅडिटचाही अभ्यास केला. त्यानंतर हे पूल कमकुवत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे सूचनाफलक लावले आहेत. २० टन क्षमतेची वाहने व २० वेगमर्यादा केली गेली आहे. पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत.- बी. एन. वहिर, कार्यकारी अभियंता,सा. बां. विभाग, महाड

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या