शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

लॉकडाऊनमध्ये शेतीच्या कामांना सूट मिळाल्याने लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:23 IST

शेतकऱ्यांनी ट्रॅकटरद्वारे शेतातील नांगरणीची कामे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे चित्र पेणमधील ग्रामीण भागात सध्या दिसत आहे.

दत्ता म्हात्रे पेण : मान्सूनच्या आगमनाला महिनाभराचा अवधी शेष आहे. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी केलेल्या लाकडाउनमुळे शेतीची कामे अडकली होती. आता २० एप्रिलपासून शेतीच्या कामांसाठी लाकडाउनमध्ये सूट देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅकटरद्वारे शेतातील नांगरणीची कामे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे चित्र पेणमधील ग्रामीण भागात सध्या दिसत आहे. शेत नांगरणी ट्रँक्टरद्वारे करण्यावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. त्यामुळे कृषी कामांना यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असून ती कामे लवकर उरकण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत.पेणमध्ये १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून यातील ५ हजार हेक्टर क्षेत्रातील मशागतीची कामे कोरोनामुळे प्रलंबित राहिली होती. सध्या कृषीविषयक कामांसाठी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्याने यांत्रिकीकरणावर शेतकºयांचा भर राहिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना येत्या महिनाभरात ही ४० टक्के शेष कामे यांत्रिकीकरण पद्धतीने उरकून वेळ व पैशाची बचत करण्याचा सुलभ मार्ग शेतकºयांनी या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अवलंबलेला आहे.या वर्षीसुद्धा मान्सून सरासरी १०० टक्के पडणार अशी भविष्यवाणी भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. बरोबर १ जून २०२० रोजी मान्सूनचे आगमन होऊन ७ जूनपासून मान्सून राज्यात स्थिरावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.गतवर्षीच्या पावसाने सर्व अंदाज मोडीत काढून सरासरीच्या दुपटीने पाऊस पडून शेतीची धूळधाण उडविली होती. या वर्षी सरासरीइतका पाऊस पडेल या आशावादानेच शेतकरी सुखावला आहे. मात्र कोरोना संसर्गाचा बाहेर धोका आहे, तो रोखण्यासाठी ४१ दिवसांच्या सक्तीच्या लाकडाउनमध्ये २० एप्रिलपासून कृषी क्षेत्रातील कामांसाठी सूट देण्यात आली आहे.>दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस शेतीची सर्व कामे उरकून शेतकरी बी, बियाणे, खते यांची खरेदी करण्यासाठी मे महिन्यातील दिवस राखून ठेवतो. मात्र या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढावले आणि सगळे जनजीवन घरातच अडकले, ते पुढे किती दिवस अडकून राहणार याबाबत अजून तरी स्पष्ट चित्र दिसत नाही.>पण नेहमीच येतो पावसाळा, शेतीची कामे लवकरच आवरा या तत्त्वाने हाती राहिलेल्या ३० दिवसांत सर्व कामे लवकर उरकण्यासाठी ट्रँक्टरद्वारे नांगरणी, उखळणीच्या कामांवर अधिक भर दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस