शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट 

By राजेश भोस्तेकर | Updated: October 16, 2024 10:46 IST

राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत.

अलिबाग : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रायगडच्या सातही विधानसभा मतदारसंघात युतीविरुद्ध आघाडी अशी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना तीन, भाजप दोन,  राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि एक अपक्ष आमदार निवडून आले होते. राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत.

अलिबाग मतदारसंघातील महेंद्र दळवी, महाडमधील भरत गोगावले आणि कर्जतचे  महेंद्र थोरवे हे तीन आमदार शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत, तर अपक्ष म्हणून विजयी झालेले उरणचे आमदार महेश बालदी हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाचे सात ही आमदार हे सत्तेत आहेत. जिल्ह्यात मनसेचा प्रभाव अधिक नसला तरी अलिबाग, पेण आणि कर्जत याठिकाणी उमेदवार उभे राहणार आहेत. 

ठाकरे गट, काँग्रेस, शेकाप,  शरद पवार गट महाविकास आघाडीत असून, ते जिल्ह्यात युतीला टक्कर देणार आहेत.

जिल्ह्यातील २०१९ मधील चित्र मतदारसंघ    आमदार    पक्ष उरण    महेश बालदी    अपक्षपनवेल    प्रशांत ठाकूर    भाजप कर्जत    महेंद्र थोरवे    शिवसेनापेण    रविशेठ पाटील    भाजप अलिबाग    महेंद्र  दळवी    शिवसेना श्रीवर्धन    अदिती तटकरे    राष्ट्रवादी काँग्रेसमहाड    भरत गोवावले    शिवसेना 

सध्याचे चित्र मतदारसंघ    आमदार    पक्ष उरण    महेश बालदी    भाजप पनवेल    प्रशांत ठाकूर    भाजप कर्जत    महेंद्र थोरवे    शिंदे गट पेण    रविशेठ पाटील    भाजप अलिबाग    महेंद्र  दळवी    शिंदे गट श्रीवर्धन    अदिती तटकरे    अजित पवार गट महाड    भरत गोवावले     शिंदे गट 

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस