शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागच्या कांद्याला स्वतःची ओळख, पेटंट विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 07:10 IST

या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ मधील कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वतःची एक ओळख प्राप्त झाली आहे. केंद्राच्या पेटंट विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पांढरा कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. बाजारात अलिबागचा पांढरा कांदा या नावाने विकल्या जाणाऱ्या अन्य कांदा विक्रीवर रोख लागणार आहे.  १५ जुलैच्या जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नलमध्ये याबाबतचे पेटंट प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अलिबागचा पांढरा कांदा हा देशात आपली स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. 

या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ मधील कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात. गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक विभागाचे प्रमुख जितेंद्र कदम आणि आत्माचे कल्पेश पाटील आणि जीएमजीसीचे प्रमुख गणेश हिंगमिरे आणि शेतकरी उत्पादक संघाचे शेतकरी सदस्य उपस्थित होते.  या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पेटंट १५ जुलैच्या केंद्राच्या जिओग्राफिकल इंडिकेशन जनरल नंबर १५८ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अलिबागच्या पांढरा कांद्याच्या नावाने वेगळा कांदा विकला जात होता, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. याकरिता कृषी विभाग,  कोकण कृषी विद्यापीठ,  ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात यासाठी एक करार केला होता.

पांढरा कांदा हा औषधी आणि गुणकारी आहे. तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, वाडगाव, सागाव, तळवली, वाडगाव, वेश्वी या गावात लागवड केली जाते. भात कापणी झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून अडीचशे हेक्टर जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते. 

अलिबागमधील शेतकऱ्यांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या नावाने इतर पांढऱ्या कांद्याची जी राज्यात विक्री केली जाते,  आता त्यास आळा बसू शकेल. कृषी विभागामार्फत आगामी काळात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील, लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल.  - डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक रायगड

पूर्वापार शेतात आम्ही पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेत आहोत. आजही कांद्याची चव आणि गुणवत्ता आम्ही टिकून ठेवली आहे. आमच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले, याचा आनंद आहे. त्यामुळे आमच्या कांद्याला मागणी वाढून भावही मिळेल. कांद्याचे उत्पादन वाढीसाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत.  - गणेश पाटील, शेतकरी

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडonionकांदा