नांगरवाडी येथे ट्रक फसल्याने अलिबाग रोहा वाहतूक बंद; एसटी प्रवाशाचे हाल
By राजेश भोस्तेकर | Updated: September 25, 2023 08:43 IST2023-09-25T08:43:32+5:302023-09-25T08:43:43+5:30
अलिबाग रोहा रस्ता वावे सुडकोली दरम्यान एकेरी मार्गाचा आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने आल्यास अडचण होत असते.

नांगरवाडी येथे ट्रक फसल्याने अलिबाग रोहा वाहतूक बंद; एसटी प्रवाशाचे हाल
अलिबाग : अलिबाग रोहा मार्गावर नांगर वाडी येथे ट्रक फसल्याने दोन्ही कडील वाहतूक बंद झाली असल्याचे एस टी प्रशासनाने सांगितले आहे. एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले आहेत. रोहा कडून येणारी आणि अलिबाग वरून जाणाऱ्या एस टी बस प्रवासी या अपघातामुळे लटकले आहेत. ट्रक बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होणार आहे. ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
अलिबाग रोहा रस्ता वावे सुडकोली दरम्यान एकेरी मार्गाचा आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने आल्यास अडचण होत असते. त्यात उमटे ते सुडकोली दरम्यान पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहने चालवताना अडचण येत असते. याच रस्त्यावर नांगर वाडी येथे रात्रीच्या सुमारास एक ट्रक हा फसला गेला आहे. त्यामुळे दोन्ही कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
ट्रक फसल्याने अलिबाग रोहा कडे प्रवास करणाऱ्या एस टी बस प्रवाशाचे हाल झाले आहेत. कामावर जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशाचे हाल झाले असल्याने पर्यायी मार्गाने कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. ट्रक अद्याप काढला न गेल्याने दोन्ही बाजूला वाहने अडकली आहे. ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र या अपघाताने प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.