१०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला - आंबेतकर
By Admin | Updated: May 2, 2017 03:02 IST2017-05-02T03:02:40+5:302017-05-02T03:02:40+5:30
स्वतंत्र सैनिक पुष्पलता आंबेतकर यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना महाराष्ट्राला

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला - आंबेतकर
तळा : स्वतंत्र सैनिक पुष्पलता आंबेतकर यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना महाराष्ट्राला १०५ हुतात्मा गमवावे लागले. तेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला. त्या हुतात्म्यांचे आज आपण स्मरण केले पाहिजे. त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
तहसील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. दलितमित्र नारायण मेकडे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगताना, तळ्याचे सुपुत्र माजी अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख यांनी या मुद्द्यावर अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा घराघरांत पोहोचला आणि हे आंदोलन उग्र झाले. म्हणूनच मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झाला, असे सांगितले.
तळे येथून नारायण मेकडे, तुकाराम पेलतेकर, माधवराव शिर्के, पुष्पलता आंबेतर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
शहरात विविध ठिकाणी महराष्ट्र दिन मोठ्या उत्साही वातारणात साजरा करण्यात आला. यावेळी तळे शहरात एस. एस. निकम इंग्लिश स्कूल येथे सदस्य चंद्रकांत रोडे, गो. म. वेदक विद्यामंदिर येथे अध्यक्ष अॅड. विद्याधर धामणकर, जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स आणि जी. एम. वेदक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पी. जी. मुळे, प्रा. आरोग्य केंद्र येथे डॉ. बिरवाटर, तळा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, तळा पं. समिती येथे सभापती रवींद्र नटे तसेच शासकीय ध्वजवंदन तहसील कार्यालयात तहसीलदार भगवान सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस विभागातर्फे पो. नि. जाधव यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
याप्रसंगी नगराध्यक्ष रेश्मा मुंढे, सभापती रवींद्र नटे, उपसभापती गणेश वाघमारे, पं. स. सदस्य देविका लासे, कदम, नगरसेवक चंद्रकांत रोडे, राजश्री पिंपळे, गटविकास अधिकारी एन. आर. परदेशी आदींसह शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
तळा शहरात एस. एस. निकम इंग्लिश स्कूल येथे सदस्य चंद्रकांत रोडे, गो. म. वेदक विद्यामंदिर येथे अध्यक्ष अॅड. विद्याधर धामणकर, जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स आणि जी. एम. वेदक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पी. जी. मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जनता विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
रसायनी : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोहोपाडा येथे सोमवारी साजरा करण्यात आला. ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व कामगारनेते राम मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्र मास मराठी व इंग्रजी माध्यमांचे प्राचार्य डी. सी. सुपेकर व बी. एस. वारे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रुती घरत व दोन्ही माध्यमांचा शिक्षक वृंद, नागरिक उपस्थित होते.
धाटाव ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण
धाटाव : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण झाल्याने रोह्यात धाटाव ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तम मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विनोद पाशिलकर, माजी सरपंच यशवंत जाधव, माजी उपसरपंच सुदाम रटाटे, रोहिदास पाशिलकर, सदस्य हरी खैरे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभा घेण्यात आली.