शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

गणेशोत्सवानंतर साखरचौथच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:43 IST

पेणसह पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या उत्तर रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाचा उत्सव चांगलेच बाळसं धरू लागला आहे.

पेण : पेणसह पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या उत्तर रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाचा उत्सव चांगलेच बाळसं धरू लागला आहे. गेल्या दशकभरात या उत्सवाची क्रेझ वाढत असून पेणच्या मूर्तिकलेला अधिक वाव मिळून देणारा हा गणेशोत्सव नावीन्यपूर्ण कलाविष्काराचा अजब नमुना ठरत आहे.दीड दिवसाचे हे गणराय व त्यांचा उत्सव सोहळा सर्वांसाठी प्रेक्षणीय असाच असतो. गणेशोत्सवाची समाप्ती झाल्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणरायांची प्रतिष्ठापना करण्याची गेले दशकभर परंपरा आहे. गावागावात तरुणाईने साखरचौथ गणराय उत्सवाचा चांगलाच लोकप्रिय केलेला आहे. साधारणपणे पेण ही गणेशमूर्तिकारांची नगरी असल्याने मूर्तिकारांना सुद्धा या उत्सवात सहभागी होता येते. मूर्तिकार बाप्पाच्या मूर्ती रंगविताना नावीन्यपूर्ण कलाविष्कार करुन कार्यशाळेच्या नावाची ओळख या मूर्तीच्या सादरीकरणातून केली जाते. युवा सार्वजनिक गणेश मंडळे व खाजगी गणपती मांडणारे गणेशभक्त या उत्सवासाठी आकर्षक मूर्तीची निवड करतात. यावेळी मूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात किंमतही मोजली जाते. त्यामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवानंतर साखरचौथ गणराय व नवरात्री उत्सवातील नवदुर्गेच्या मूर्ती अतिरिक्त व्यवसाय करून आर्थिक सधनता मिळते.साखरचौथ गणराय उत्सवाला यावर्षी अंगारकी योग असल्याने या उत्सवाचे महत्त्वसुद्धा वाढलेले आहे. पेणच्या खारेपाट विभागातील गावांमध्ये हा उत्सव गावोगावीखाजगी व सार्वजनिक स्वरुपातमोठ्या प्रमाणात साजरा केलाजातो.मूर्तिकलेचे माहेरघर असलेले हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे, दादर, रावे व जिते या परिसरात साखरचौथ गणरायाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर वाशी विभाग वडखळ विभाग ते गडब, आमटेम या विभागात सार्वजनिक मंडळाचे बाप्पा मोठ्या प्रमाणात उत्सवप्रसंगी दिसतात.>संकष्ट चतुर्थीला होणार प्रतिष्ठापणासाखरचौथ गणरायाचा उत्सवाचा माहोल पेण शहरासह ग्रामीण परिसरात उत्सव मंडळे सज्ज झाली असून मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टीला पुन्हा एकदा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मूर्तिकारांच्या कार्यशाळा ते सार्वजनिक साखरचौथ गणेश मंडळाच्या उत्सव मंडपात सजावट, आरास, लाइटिंग यासह गणेशभक्तांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :ganpatiगणपती