शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:44 IST

तपासणीत आढळले लेप्टो, काेराेना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण ; १८ वैद्यकीय पथके तैनात

ठळक मुद्देमहाड-तळीयेमध्ये दरड काेसळल्याने ८४ नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित ३१ जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याने लवकरात लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान

रायगड : महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरित पडसाद पूर ओसरल्यानंतर दिसू लागले आहेत. कारण आता महाडमध्ये साथीच्या रोगांचे संकट उभे राहिले आहे. महाडमध्ये आतापर्यंत १२,९३१ जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली, तर ३८० नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये लेप्टोपायरोसिसचे १९, काेराेनाचे तीन, डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण २६ रुग्ण आढळले आहेत.

महाड आणि पाेलादपूरमध्ये अतिवृष्टीने पूर, दरडी काेसळल्या हाेत्या. महाड-तळीयेमध्ये दरड काेसळल्याने ८४ नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित ३१ जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही ११ जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापूर आला. तब्बल १५ फुटांहून अधिक पाणी हाेते. आता महापूर ओसरला आहे. परंतु शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याने लवकरात लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासनापुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. राेगराई पसरू नये यासाठी विविध ठिकाणची १८ वैद्यकीय पथके महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल १२ हजार ९३१ नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार ४१६ जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. त्यामुळे ३८० नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यात तिघांना  काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. लॅप्टाेपायरोसिसचे १९ रुग्ण तर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण २६ रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. महाड, पाेलादपूरमध्ये साथी फैलावू नयेत यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

संसार वेचण्यात नागरिक गुंतलेलेमहाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार, असा प्रश्न आहे. दरम्यान, महाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरू नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :floodपूरRaigadरायगड