अध्यक्षपदी अदिती तटकरे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित

By Admin | Updated: March 21, 2017 02:07 IST2017-03-21T02:07:12+5:302017-03-21T02:07:12+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड

Aditi Tatkare as President, Adv. Aashwad Patil's choice is fixed | अध्यक्षपदी अदिती तटकरे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित

अध्यक्षपदी अदिती तटकरे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत निश्चित करण्यात आली असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया गेल्या २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊ न पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले असून २१ मार्च २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना. पाटील सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होणार
आहे. या पार्श्वभूमीवर शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत पनवेल येथे कर्नाळा भवनमध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे.
मंगळवारी २१ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित झाली आहे, असे अ‍ॅड. देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Aditi Tatkare as President, Adv. Aashwad Patil's choice is fixed