विनापरवाना दारू प्रकरणी कारवाई
By Admin | Updated: April 26, 2017 00:31 IST2017-04-26T00:31:41+5:302017-04-26T00:31:41+5:30
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात दोन ठिकाणी, अलिबाग तालुक्यात एका ठिकाणी विनापरवाना हातभट्टीची फुग्यातील दारू जप्त केली आहे.

विनापरवाना दारू प्रकरणी कारवाई
रेवदंडा : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात दोन ठिकाणी, अलिबाग तालुक्यात एका ठिकाणी विनापरवाना हातभट्टीची फुग्यातील दारू जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुरुड-जंजिरा तालुक्यातील शंकरवाडी चोरडेमधील रमेश काटकर (३०) याच्याकडे विनापरवाना हातभट्टीच्या दारूने भरलेले सत्तर फुगे सातशे रुपये किमतीचे जप्त केले असून आरोपी रमेशला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या घटनेत पोलीस ठाणा हद्दीतील खानाव (ता. अलिबाग) मधील शेतात विनापरवाना हातभट्टीची दारू फुग्यात भरलेली सापडली असून तिची किंमत आठशे रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी परशुराम शेळके (५४, रा. आंदोशी, ता. अलिबाग) याला ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या घटनेत चौल आग्रावमधील दयाराम रामनाथकर (७२) याच्याकडे देशी- विदेशी दारूच्या बाटल्या मिळाल्या असून दयारामला ताब्यात घेतले आहे.