रोह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By Admin | Updated: June 3, 2016 02:00 IST2016-06-03T02:00:19+5:302016-06-03T02:00:19+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सा. रा. साळुंखे, औषध निरीक्षक वि.ब. तासखेडकर व को.गो. गादेवार यांच्या पथकाने पंचासमवेत

रोह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
रोहा : गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सा. रा. साळुंखे, औषध निरीक्षक वि.ब. तासखेडकर व को.गो. गादेवार यांच्या पथकाने पंचासमवेत रोहे दमखाडी येथील डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव, एम.एस. (आॅपथॅलमॉलजिस्ट) यांच्या सुमन नेत्रालय या रूग्णालयाची चौकशी केली असता डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव यांनी रूग्णालयाच्या आवारातील एका गाळ्यामध्ये विनापरवाना औषधाचे दुकान सुरू केल्याचे आढळून आले. या दुकानातून ४ लाख ३० हजार रूपये किमतीची विविध औषधे, इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त केला.
डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव यांनी रूग्णालयाच्या आवारात सुरू केलेल्या विनापरवाना औषध दुकानातून त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत रूग्णालयात येणाऱ्या ग्राहकांना, परिसरातील इतर डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून व विनाचिठ्ठीही औषधांची विक्र ी करीत होते असे दिसून आले. चौकशीच्या सुरूवातीस औषधांची बेकायदा विक्र ी सिध्द करण्यासाठी एका पंचास औषध खरेदीसाठी एका चिठ्ठीवर औषधांची नावे लिहून पाठविण्यात आले. त्या पंचास उपरोक्त दुकानातील हजर रूग्णालयाच्या एका महिला कर्मचाऱ्याने औषध विक्र ी केली. बिल मागणी करता सचिन मेडिकल स्टोअर्स, घर क्र . ६७९, दमखाडी-रोहा, जि. रायगड या नावाचे बिल देण्यात आले. अधिक चौकशी करता यापूर्वी उपरोक्त जागी एका रजिस्टर्ड फार्मासिस्टला किरकोळ औषध विक्र ीसाठी परवाने मंजूर होते. हे परवाने त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये रद्द करण्यासाठी प्रशासनास सादर केले होते. हे परवाने प्रशासनाने रद्द केल्यानंतर दुकानाचा ताबा डॉक्टरांकडे देण्यात आला होता. उपरोक्त डॉक्टराने या ठिकाणी औषधाचे दुकान विनापरवाना सुरू केल्याचे दिसून आले. ही बाब औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलमाचे उल्लंघन करणारी आहे. तपासणी वेळी सुमारे ४ लाख ३० हजार रूपये किमतीची औषधे, औषधांची खरेदी बिले, विक्री बिले व इतर अभिलेख वि.ब. तासखेडकर औषध निरीक्षक, रायगड-पेण यांनी जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची कस्टडी अलिबाग न्यायालयात अर्ज दाखल करून प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील कलमान्वये डॉक्टरांच्या विरूध्द न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सा.रा. साळुंखे यांनी दिली. (वार्ताहर)