उल्हास नदीत उत्खननावर कारवाई
By Admin | Updated: December 17, 2015 23:19 IST2015-12-17T23:19:53+5:302015-12-17T23:19:53+5:30
बेकायदा रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम कर्जत तालुक्यात महसूल खात्याने उघडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्र ारीनंतर कर्जत महसूल विभागाने

उल्हास नदीत उत्खननावर कारवाई
कर्जत : बेकायदा रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम कर्जत तालुक्यात महसूल खात्याने उघडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्र ारीनंतर कर्जत महसूल विभागाने तत्काळ नेरळ दहिवली येथे उल्हास नदीवर जावून धाड टाकली. तेथे रेती उत्खनन करणारी यंत्रणा जप्त केली असून तेथे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांचा शोध महसूल खाते घेत आहे.
उल्हास नदीवरील दहिवली पुलाच्या जवळ नदीलगत धामोते येथील शेतकऱ्यांची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये बेकायदा जेसीबी मशीन लावून रेती काढण्यात येत असल्याची तक्र ार शेतकरी कृष्णा पेरणे यांनी केली होती. त्यानंतर कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी जावून धाड टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नायब तहसीलदार दिनकर मोडक, नेरळचे मंडल अधिकारी एच. एन. सरगर, दहिवली सजाचे तलाठी जी. ए. जाधव यांनी दहिवली पूल परिसरात रेती उत्खनन होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा काढून ठेवलेला रेती साठा जप्त केला. त्याचवेळी रेती साफ करण्याच्या अकरा जाळ्या, फावडे, घमेले आदी साहित्य जप्त केले. (वार्ताहर)