शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

‘ठेवीदारांचा प्रतिनिधी म्हणून भूमिका मांडणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:54 PM

Pen :  रविवारी खासदार सुनील तटकरे यांनी पेण शहरात धावती भेट दिली.

पेण : पेण अर्बन बँकेत ठेवीदारांचा एक प्रतिनिधी या भूमिकेतून समस्या सोडविण्याचे काम करणार, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील कार्यक्रमात दिली. रविवारी खासदार सुनील तटकरे यांनी पेण शहरात धावती भेट दिली. तेंव्हा पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी  खा. तटकरे यांची भेट घेऊन त्यांना बँकेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत यासाठी निवेदन दिले. खासदार तटकरे यांनी मागच्या संसदीय अधिवेशनात पेण अर्बन बँकेला भूमिका मांडण्याची संधी मला मिळाली, यावेळी मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पेण अर्बन बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा सुरू असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. पेण अर्बन बँकेची याबाबत ठोस भूमिका मांडण्यासाठी विविध कागदaपत्रांची पूर्तता करून सक्षमरीत्या आपले प्रश्न केंद्र व राज्यात मांडण्यात येऊन बँकेचा प्रश्न तडीस नेण्यास मी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आघाडी सरकार केंद्राकडे अर्बन बँकेबाबत लवकर कार्यवाही कशा प्रकारे करता येईल याकडे जातीने लक्ष देतील. यामुळे ज्या ठेवीदारांचे पैसे पेण बँकेत अडकले आहेत त्यांना निश्चित न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे