खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 28, 2016 02:32 IST2016-05-28T02:32:47+5:302016-05-28T02:32:47+5:30
संपूर्ण देशभरात रिलायन्स कंपनीने फोरजी केबलचे जमिनीअंतर्गत काम हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यात ठेकेदार नेमून प्रत्येक तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. असेच

खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
श्रीवर्धन : संपूर्ण देशभरात रिलायन्स कंपनीने फोरजी केबलचे जमिनीअंतर्गत काम हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यात ठेकेदार नेमून प्रत्येक तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. असेच रिलायन्स फायबर केबलचे काम म्हसळा-श्रीवर्धन हद्दीमध्ये सुरू असून, हे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागण्याची घटना घडली
आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वडघर, पागळोल या गावांच्या हद्दीमध्ये रिलायन्स फोरजी केबलचे काम सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील फायीज नझीर यांच्या मालकीचे जेसीबी व ४० मजूर तेथे काम करीत आहेत. हे काम चालू असताना तुम्हाला जर पुढे काम चालू ठेवायचे असेल तर मला ५० हजार
रुपये द्यावे लागतील, नाही तर मी काम सुरू करू देणार नाही, अशी धमकी म्हसळा येथील युवक विसम दाऊद हुर्जुक यांनी दिली. या रकमेची मागणी केल्यानंतर जेसीबी चालकाला मारहाण करून जेसीबीची चावी घेऊन तेथून निघून गेला.
या घटनेची माहिती जेसीबीचा चालक व साइट सुपरवायझर यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली. या दोघांच्या फिर्यादीवरून आरोपी विसम दाऊद हुर्जुक (रा. म्हसळा) याच्या
विरुद्ध गुन्हा करण्यात आला असून, गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस उप विभागीय अधिकारी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)