धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावर स्कॉर्पियो आणि मोटारसायकल यांच्यात शुक्रवारी रात्री अपघात झाला. या दोन्ही वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. शुक्र वारी रोहा-कोलाड रस्त्यावर बालाजी कॉम्प्लेक्ससमोर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कोलाडबाजूकडून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पियो (एमएच-०६-एझेड- ९७३३) मुरु डकडे जात असताना रोह्याकडून भरधाव वेगाने कोलाडकडे जाणाऱ्या (एमएच-०६-बीएच-३२७९) क्र मांकाच्या बजाज डिस्कव्हर मोटारसायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत रोहिदास हरिश्चंद्र जाधव (रा. येरळ, आदिवासीवाडी, ता. रोहा) व मंगेश जाधव (रा. महादेववाडी कोलाड, ता. रोहा) यांना गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांनाही त्याच स्कॉर्पियो गाडीतून पोलीस हवालदार आर. डी. म्हात्रे, पो.ना. राकेश राऊळ, पो.ना. संदीप देसाई यांनी रोह्यातील शासकीय रु ग्णालयात आणले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचाराकरिता अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
रोहा-कोलाड रस्त्यावर अपघात
By admin | Updated: August 8, 2015 22:03 IST