शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Accident: डंपर नेले फरफटत, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, दुचाकीला भीषण धडक, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:17 IST

Accident: कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील तरुणाचा डंपरच्या धडकेत जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका दाम्पत्याला जिवाला मुकावे लागले.

नेरळ : कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील तरुणाचा डंपरच्या धडकेत जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका दाम्पत्याला जिवाला मुकावे लागले. कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे डंपरने धडक देऊन दाम्पत्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.           

जिते गावात राहणारे योगेश रामदास जाधव व योगिता योगेश जाधव हे दाम्पत्य चुलत बहिणीच्या लाखरण येथील घरी दुचाकीवरून जात होते. भिवपुरी मार्गे सकाळी जात असताना भिवपुरी रेल्वेस्थानक परिसरातील चिंचवली रेल्वे गेट येथे योगेश यांच्या दुचाकीला खदानीच्या डंपरने धडक दिली. दुचाकीवरून पडलेल्या योगिताच्या अंगावरून  चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.. तर योगेश डंपरच्या चाकात अडकला. मात्र डंपर चालकाने त्याला फरफटत नेले. त्यामुळे योगेश गंभीर जखमी झाला. त्याला भिवपुरीच्या रायगड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

योगेशच्या कमरेकडील भागावरून टेम्पोचे चाक गेल्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी चालक डंपर रस्त्यातच उभा करून  फरार झाला. कर्जत शहराजवळ खदान असलेल्या चिरमाडे याचा तो डंपर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.        नेरळ पोलिसांनी घटनेचा पंचानामा करून दोन्ही मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . तर चालकाला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

चालकांबाबत संतापकर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील एका तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला तर रविवारी या दाम्पत्याचा मृत्यू झाला. डंपर चालकांची या मनमानीबाबात तीव्र संताप व्यक्त होत असून घटनेननंतर उपस्थित जमावानेही रोष व्यक्त केला.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड