शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञाअभावी हाल; सहा महिन्यांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 23:24 IST

पोलादपूरमधील स्थिती

- प्रकाश कदम पोलादपूर : पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून भूलतज्ज्ञ नसल्याने गर्भवतींना प्रसूतीसाठी महाड अथवा माणगाव येथे पाठविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही महाड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात करून घेण्याचे सांगण्यात येत असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त होत आहे.पोलादपूर शहरापासून एक किलोमीटरवर मुंबई-गोवा महामार्गालगत शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्यासाठी हे एकमेव ग्रामीण रुग्णालय असून त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठी असते. या ठिकाणी प्रसूतीसाठी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम-डोंगराळ भागातून महिला येतात. या वेळी शस्त्रक्रिया करायची असल्यास, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यायची असल्यास महाडमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो.

गेल्या सहा महिन्यांपासून या रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत. तालुक्यातील पळचिल, महालगुर, ओंबळी कुडपण, मोरगिरी, कामथे, बोरघर, खांड्ज, ढवळे, उमरठ, देवळे, दाभीळ किनेश्वर, आडावळे, बोरावले ही गावे आणि या गावांच्या दहा कि.मी. परिघातील वाड्या-वस्त्यासाठी हे रुग्णालय सोयीचे आहे. मात्र, प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्यावर तिला पुरेशा सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात रुग्णाला जेवण देण्याची सुविधा नाही. परिणामी, रुग्ण तीन-चार दिवस दवाखान्यात असेपर्यंत घरून जेवणाचा डबा आणावा लागतो किंवा आजूबाजूच्या खानावळ किंवा हॉटेलमधून सोय करावी लागते. महिलेला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी १७ किलोमीटरवर असलेल्या महाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले जात असल्याने रुग्णासह कुटुंबीयांचेही प्रचंड हाल होतात.

वास्तविक या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर महिला वैद्यकीय अधिकारी असून त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षही अद्ययावत व सुसज्ज आहे. तरीही येथे शस्त्रक्रिया केल्या जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मनुष्यबळाअभावी सेवेवर परिणाम

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १००ते १५० रुग्ण येतात. तसेच आंतररुग्ण विभागातही रुग्ण दाखल आहेत. मात्र, हे दोन्ही विभागात वैद्यकीय अधीक्षक वगळता एक आयुष डॉक्टर सेवारत आहे.

वास्ताविक रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ ची तीन पदे रिक्त आहेत. त्यापैकी एक आयुर्वेदिक डॉक्टरचे पद रिक्त आहे, यामुळे या रुग्णालयाचा भार वैद्यकीय अधीक्षक आणि आयुष डॉक्टर सांभाळत आहेत. मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवा कोलमडली आहे.पूर्वी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि सिझेरिअन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, या ठिकाणी भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रियासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय रायगड-आलिबाग यांनी या रुग्णालयासाठी भूलतज्ज्ञाची नियुक्ती केल्यास शस्त्रक्रिया केल्या जातील.- डॉ भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार