शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Abdul Sattar vs NCP: सरड्याप्रमाणे पक्ष, रंग बदलणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्यात फिरु देणार नाही!; रायगडच्या उरण NCPचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 21:36 IST

उरण तालुका प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा इशारा

Abdul Sattar vs NCP | मधुकर ठाकूर, उरण: अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवर तीव्र शब्दात निषेध करतानाच, सरड्याप्रमाणे पक्ष व रंग बदलणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी न केल्यास त्यांना राज्यात फिरुन दिले जाणार नसल्याचा कडक इशारा मंगळवारी उरणच्या राष्ट्रवादीने निषेध रॅली काढून दिला. राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर केल्याने राज्यभरात राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उरण तालुका राष्ट्रवादीने उरण शहरातुन निषेध रॅली काढली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत रायगड जिल्हा उपाध्यक्ष ॲड.भार्गव पाटील, राष्ट्रवादीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष  तालुका वैजनाथ ठाकूर,उरण तालुका अध्यक्ष मनोज भोईर, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, पुखराज सुतार आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी रॅलीतून 'नीम का पत्ता...' आणि शिंदे -फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुजोर बोक्यांनी ५० खोके घेऊन महाराष्ट्राचे वाटोळे केले, असा टोला राष्ट्रवादीकडून लगावण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार टीका करतानाच, सरड्याप्रमाणे पक्ष व रंग बदलणाऱ्या मुजोर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी न केल्यास त्यांना राज्यात फिरुन दिले जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला. तर शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर आसूड ओढाताना महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांनी केली. आता माफीनामा नको, तर राजीनामा द्या अशीही मागणी संतप्त राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaigadरायगड