दहा दिवसीय घरगुती गणपती सजावटीत आरेकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:24 IST2019-09-10T23:24:43+5:302019-09-10T23:24:50+5:30
मुरुड शहरातील एकूण ३५ जणांनी सहभाग घेतला होता. मूर्ती व सजावटीचे परीक्षण करण्यासाठी डॉ. नानासाहेब यादव व वसंत पोळेकर, संदीप पारेख यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती

दहा दिवसीय घरगुती गणपती सजावटीत आरेकर प्रथम
आगरदांडा : पर्यावरणाचा होणारा ºहास टाळण्यासाठी इकोफ्रेंडली सजावट साकारणाऱ्या मुरुडच्या जयप्रकाश आरेकर यांना यंदाचा दहा दिवसीय घरगुती गणपती सजावट स्पर्धेत नगराध्यक्ष चषक देऊन सन्मानित केले आहे.
क्राफ्ट पेपरपासून बनवलेले रंगीबेरंगी फुले, न्यूज पेपरपासून बनवलेले फ्लॉवर फ्रेम, फ्लोअरिंग रोल, सुदर्शन चक्र, आयुध आदी वस्तूंचा वापर करून हस्तकलेतून सादर करण्यात आलेली सजावट उत्तम प्रकारे सादर करण्यात आली. ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून विज्ञान युगात दिशाभूल झालेल्या नव्या पिढीने या कलेची दखल घेतली पाहिजे यांनी केलेल्या या सुजाण सजावटीला मुरुड नगरपरिषद गणेश सजावट स्पर्धा २०१९ च्या प्रथम क्रमांकाच्या नगराध्यक्ष चषकाचा मानकरी ठरविण्यात आले.
मुरुड शहरातील एकूण ३५ जणांनी सहभाग घेतला होता. मूर्ती व सजावटीचे परीक्षण करण्यासाठी डॉ. नानासाहेब यादव व वसंत पोळेकर, संदीप पारेख यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणी करुन मूर्ती व सजावटीमध्ये पहिला, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ यांच्या नावाची यादी सीलबंद करुन मुरुड -जंजिरा नगरपरिषद कार्यालयात दिली. त्याच दिवशी मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेवक विश्वास चव्हाण, जनार्दन हाटे, परीक्षक वसंत पोळेकर, डॉ. नानासाहेब यादव, संदीप पारेख यांच्या उपस्थितीत ते सीलबंद लिफाफ्यामधून विजेत्यांची नवे घोषित करण्यात आली. त्यामध्ये मुरुड-कोळीवाडा येथील जयप्रकाश आरेकर यांना प्रथम क्रमांक, मुरुड- कोळीवाडा जितेंद्र मकू द्वितीय क्रमांक, मुरुड- भंडारावाडा विजय पैर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. तर उत्तेजनार्थ संतोष बळी.
तर मूर्तिकाराचे मानकरी प्रथम क्रमांक गणेश मकू यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार- पांडुरंग पाटील), द्वितीय संतोष मकू यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार नामदेव वारजे), तृतीय क्रमांक प्रवीण बैकर यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार विजय भगत) व उत्तेजनार्थ उदय दांडेकर यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार चंद्रकांत बुल्लू) यांना देण्यात आला आहे.