पनवेलजवळील आसुडगाव पेट्रोल पंपाला भीषण आग
By Admin | Updated: April 12, 2016 14:24 IST2016-04-12T12:39:15+5:302016-04-12T14:24:33+5:30
कळंबोली - पनवेल मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की आगीत दोन टँकर जळून खाक झाले असल्याची माहिती मिळाली आहे

पनवेलजवळील आसुडगाव पेट्रोल पंपाला भीषण आग
>
ऑनलाइन लोकमत -
रायगड, दि, १२ - कळंबोली हायवेलगतच्या पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे पेट्रोल पंपासह तिथे उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीवर अजून नियंत्रण मिळालं नसून आग भीषण रूप घेत आहे़. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचं प्रयत्न करत आहेत. आग पेट्रोल पंपालाही लागल्याने छोटे छोटे स्फोटही होत आहे. दरम्यान, आतापर्यंत या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले आहेत. पेट्रोलपंप हायवेलगत असल्याने मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.