शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

चिर्लेतून एलिव्हेटेड कॉरिडॉर एक्स्प्रेल वेला जोडण्याचा प्रस्ताव; १३५२  कोटी खर्चाचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 10:07 IST

भविष्यात वाहतूक सहजसुलभ होण्यासाठी प्रकल्प : लोणावळा -खंडाळा -मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी ९० मिनिटांनी कमी होण्याचीही शक्यता !

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए बंदरातुन प्रचंड होणाऱ्या अवजड मल्टी एक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीचा व वाहतूक कोंडीचा नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवरील ताण कमी करण्याचा  एक प्रयत्न म्हणून मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकच्या चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पे फाटा ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत सात किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित १३५२  कोटी खर्चाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी सहजसुलभ होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी शुक्रवारी दिली.

काय आहे प्रस्तावित प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकमुळे मुंबईतुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे-गोवा महामार्गाशी जोडणाऱ्या भागांशी अवघ्या २० मिनिटांत पोहचता येणार आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक व जेएनपीएच्या वाढत्या अवजड कंटेनर मालाच्या वाहतूकमुळे भविष्यात तयार करण्यात येत असलेल्या या मार्गावर वाहतूक कोंडींचे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून हा नियोजित कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ते चिर्ले येथील मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक  एमटीएचएल इंटरचेंजपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉरचे बांधकाम करण्यात येणार आहे.

तीन भागात काम

पहिला भाग-:सध्याच्या एनएच-३४८ च्या मध्यभागी चिर्ले इंटरचेंज ते गव्हाणफाटा पर्यंत सहा लेनचा उन्नत कॉरिडॉर प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गाच्या पनवेल - उरण विभागात आरओबी प्रदान करणे समाविष्ट आहे.  यामध्ये गव्हाणफाटा येथील डबल डेकर एलिव्हेटेड कॉरिडॉरचाही समावेश आहे.

दुसरा भाग-:सध्याच्या एनएच-४८ च्या मध्यभागी पळस्पे फाटा ते मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे पर्यंत सहा लेनचा उन्नत कॉरिडॉर प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गाच्या पनवेल- रोहा विभागात आरओबी  प्रदान करण्याच्या कामाचा समाविष्ट आहे.

तिसरा भाग:-मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ते मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक  पर्यंत रहदारीसाठी २ लेनचा युपी रॅम्प प्रदान करण्यात येणार आहे.तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विद्यमान व्हीओपीचे रुंदीकरण,जुन्या मुंबई-पुणे महामार्गापासून विद्यमान एनएच-४८ पर्यंतच्या रहदारीसाठी दोन लेन अप आणि डाऊन रॅम्प प्रदान करण्याच्या कामाचाही  समाविष्ट करण्यात आला आहे.तसेच सध्याच्या  एनएच-४८ पळस्पे फाटा ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सिमेंट काँक्रीट फुटपाथमध्ये रुंदीकरण आणि सुधारणाही केल्या जाणार आहेत.

आवश्यक जमीन:-  एकूण ४.७४ हेक्टर जमीनीवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यामध्ये ०.२३६ हेक्टर वनजमिनींचाही आहे.

प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे फायदे :

 प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रोडपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपर्यंत सुरळीत वाहतूक व्यवस्था प्रदान करणारे आहे.मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रस्ता एनएच-३४८ वर चिर्ले जंक्शन येथे संपतो. एनएच-३४८वर नेहमीच अवजड रहदारी असते. विशेषत: जेएनपीए बंदरामुळे मल्टी एक्सल कंटेनर ट्रकची, त्यामुळे मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवर ट्रॅफिक जाम न होता सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक ट्रॅफिक विलीन करण्यासाठी आवश्यकतेनुसार मदत मिळणार आहे.त्यामुळेच चिर्ले येथील मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकच्या टोकापासून ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत प्रस्तावित विकास केला जाणार आहे.या प्रस्तावित कामामुळे वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गोवा महामार्गावर सहज आणि द्रुतपणे प्रवेश करू शकते.या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.पळस्पे ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा एलिव्हेटेड कॉरिडॉर रसायनी जंक्शनच्या पलीकडे सुरू आहे आणि त्यामुळे रसायनी जंक्शनवरील मुख्य कॅरेजवे वाहतूक संघर्षमुक्त होणार आहे.लोणावळा -खंडाळा -मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी ९० मिनिटांनी कमी होणार आहे.नवी मुंबईतील अरुंद लेन कनेक्टिव्हिटीमुळे निर्माण होणारी अडचण दूर होईल आणि मुंबई आणि पुणे दरम्यान वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाचा खर्च ७.३५ किमी एकूण लांबी असलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉर महामार्गावरील मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळ ३ + ३ लेनच्या गल्ल्या तयार करण्यात येणार आहेत.या प्रस्तावित प्रकल्पावर एकूण १३५१.७३ कोटी रुपये खर्च होणार आहे.या कामाच्या निविदाही मागविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए