बोर्ली-मांडला : जुळे बाळ घरी आल्याच्या आनंदात न्हालेल्या कुटुंबावर काही तासांतच दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यात घडली. अलिबाग वनविभागातील तीनवीरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सूरज सारंगे यांचा शुक्रवारी रात्री उशिरा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला. रेवस-रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वनविभागात शोककळा पसरली आहे.
मुरुड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सूरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तीनवीरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस-रेड्डी मार्गावर खोदलेल्या खड्ड्यात त्यांची मोटारसायकल कोसळली. खड्डा खोल असल्याने दुचाकीचा तोल जाऊन सारंगे खाली पडले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सूरज सारंगे यांना जुळे अपत्य झाले होते. शुक्रवारीच ही दोन्ही बाळांना रुग्णालयातून घरी आणले होते.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या, रात्री चालकांना दिसण्यासाठी लाल दिव्यांची व्यवस्था केलेली नव्हती. या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने संताप व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
Web Summary : Raigad: A forest ranger, Suraj Sarange, died in an accident on the Revas-Reddy road due to a pothole. He had just brought his newborn twins home. Negligence regarding road work safety is suspected, sparking outrage and calls for action.
Web Summary : रायगढ़: रेवस-रेड्डी मार्ग पर गड्ढे के कारण दुर्घटना में वन रक्षक सूरज सारंगे की मौत हो गई। वह अभी अपने नवजात जुड़वां बच्चों को घर लाए थे। सड़क कार्य सुरक्षा में लापरवाही का संदेह है, जिससे आक्रोश और कार्रवाई की मांग हो रही है।