म्हसळेतून आठ किलो प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:35 IST2018-10-23T23:35:56+5:302018-10-23T23:35:57+5:30
शासनाच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी म्हसळा शहरातील पंधरा दुकानात धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली.

म्हसळेतून आठ किलो प्लॅस्टिक जप्त
म्हसळा : शासनाच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी म्हसळा शहरातील पंधरा दुकानात धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली. या वेळी व्यापाºयांकडून ८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
पंधरापैकी तीन व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगरपंचायत व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईविरु द्ध शहरातील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. महाराष्ट्र शासनाने १ आॅक्टोबरपासून प्लॅस्टिक बंदीबाबत कडक पावले उचलल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड येथील उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार व म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी संयुक्तरीत्या शहरातील दुकानात धाडसत्र सुरू करून दंडात्मक कारवाई करण्यास सुरु वात केली. मात्र, या कारवाईने व्यापारीवर्गात तीव्र नाराजी पसरली असून, दुकाने बंद करून शहरातून जाणारा राज्य मार्ग काही तासांसाठी जाम केला.